Kolhapur to Ashtavinayak Darshan Tour

Moreshwar Temple,Morgaon Chintamani Temple,Theur Siddhi Vinayak-Sidhatek Mahaganpati Temple,Ranjangaon Vighaneshwar Temple,Ozar Girijatmaja Temple,Lenyadri Bhavani Mandap / Old Palace Kolhapur Kolhapur Vighaneshwar Temple, Ozar

Ashta Vinayak Darshan [4 Days Tour]

  • We are arranging on 14th August to 18 August 2016.
  • Including Travel Food And Accommodation
  • Expense 3100 per seat

१) श्री मयुरेश्वर - श्री मोरेश्र्वर ( मोरगाव)

Moregaon Moreshwar Temple

गाभार्‍यातील मयुरेश्वराची मुर्ती अत्यंत आकर्षक आहे. मुर्ती बैठी व डाव्या सोंडेची पूर्वाभिमुख आहे. मुर्तीच्या डोळ्यात व बेंबीत हिरे बसविले आहेत. मस्तकावर नागराजाचा फणा आहे. मुर्तीच्या डाव्या उजव्या बाजूस सिध्दिबुध्दीच्या पितळी मुर्ती असून पुढे मुषक व मयूर आहे.

गणपतीसमोर आपल्या पुढ्च्या दोन पायात लाडू घेऊन उभा असलेला एक भला मोठा दगडी उंदीर आहे. तसेच चौथरयावर मोठा नंदी आहे. भाद्रपद शुध्द चतुर्थी (गणेशजयंती) असे दोन मोठे उत्सव होतात. मोरया गोसावी दर शुध्द चतुर्थीला मोरगावला यात्रेला जात असत. आजही माघ शुध्द चतुर्थी व भाद्रपद शुध्द चतुर्थी या दिवशी चिंचवाहून मोरगावला देवाची पालखी जाते.


२) श्री. चिंतामणी (थेऊर)

Theoor, Chintamani Temple

श्री चिंतामणी हे विनायकस्थान पुणे जिल्हयातील हवेली तालुक्यातील थेऊर या गावी आहे. हे क्षेत्र अतिप्राचीन समजले जाते. थेऊरला जाण्यासाठी यात्रेकरूनी पुण्याला प्रथम येणे हे चांगले तसेच मोरगाव, थेऊर, लेउयाद्री, ओझर, रांजनगाव हे अष्टविनायकातील पाच गणपती पुण्यापारून जवळ व सोयीस्कर आहेत.

श्री चिंतमणी डाव्या सोंडेचा पूर्वाभिमुख आहे. मांडी घातलेले आसन आहे. मंदिराचा कळस सोन्याचा मुलामा दिलेला आहे.
भाद्रपद शुध्द चतुर्थी श्री चिंतामणीचा उत्सव मोठ्या प्रमाणात साजरा केला जातो. गणेशभक्त माधवराव पेशवे यांचे देहावसन येथेच झाले. त्यांच्या पत्नी रमाबाई त्यांचेबरोबर सती गेल्या त्यांचे वृंदावन मुळा - मुठेच्या कठावर आहे. चिंचवड्चे श्री मोरया गोसावी यांनी तपश्चर्या करून सिध्दी प्राप्त करून घेतल्या होत्या. तेथे त्यांना व्याघ्र स्वरुपात श्री गणेशाचे दर्शन झाले.


३ श्री सिध्दिविनायक (सिध्दटेक)

Siddhivinayak Temple, Siddhatek

श्री सिध्दिविनायक हे गणेशस्थान नगर जिल्हयातील कर्जता तालुक्यात सिध्द्टेक या गावी आहे

श्री सिध्दिविनायकाची मूर्ती स्वयंभू असून ती तीन फूट उंच व अडीच फूट रूंद आहे. मूर्ती उत्तराभिमुखी गजमुखी आहे. सोंड उजवीकडे असल्याने सोवळे कडक आहे. एक मांडी घातलेली असून त्यावर ऋध्दिसिध्दि बसलेल्या आहेत. प्रभावळीवर सूर्य , चंद्र, गरूड यांच्या आकृत्या असून मध्याभागी नागराज आहे. उजव्या व डाव्या बाजूस जयविजय आहेत.


४ श्री महागणपती ( रांजणगाव)

Mahaganapati Temple, Ranjangaon

हे विनायक स्थान पुणे जिल्हयातील रांजनगाव या ठिकाणी आहे. हे क्षेत्र श्री शंकरांनी बसविले असे म्हणतात. पूर्वी याला मणिपूर असे म्हणत. श्री शंकरांनी गृत्समदपुत्राचा , त्रिपुरासुराचा येथेच वध केला.


५ श्री विघ्नेश्वर (ओझर)

Vighneshwar Temple, Ozar

रांजनगावच्या गणपतीचे मंदिर पूर्वाभिमुखी असून मंदिरात दिशासाधन केले आहे. त्यामुळे उत्तरायणात, दक्षिणायनात व मध्यानकाळी गणेशाच्य मूर्तीवर सुर्यकिरण पडतात.
मंदिरातील गणपतीची मूर्ती पूर्वाभिमूखी, डाव्या सोंडेची व आसनमांडी घातलेली आहे. मूर्ती अत्यंत मोहक असून दोन्ही बाजूला ऋध्दि सिध्दि उभ्या आहेत.


६ श्री गिरिजात्मज ( लेण्याद्री)

girijatmaj Temple , Lenyadri

श्री विघ्नेश्वरास अष्टविनायकात फार मानाचे स्थान आहे. हे अत्यंत रमणीय स्थान म्हणून प्रसिध्द आहे. पुणे जिल्हयातील जुन्नर तालुक्यातील नारायणगावापासून ८ कि.मी अंतरावर ओझर हे गाव आहे.

श्री विघ्नेश्वराची मूर्ती पूर्वाभिमुख, डाव्या सोंडेची, पूर्णाकृती व आसन मांडी घातलेली आहे. मूर्तीच्या दोन्ही डोळ्यात माणके, कपाळावर चकचकित हिरा व बेंबीत खडा बसविला आहे. मूर्तीच्या दोन्ही बाजुस ऋध्दि सिध्दिच्या पितळी मूर्ती आहेत. देवाची मूर्ती डौलदार कमानीत आहे.


७ श्री वरद विनायक (महड)

Varadvinayak Temple, Mahad

श्री वरद विनायक हे स्थान कुलाबा जिल्हयातील खालापूर तालुक्यातील महड या गावी आहे.

गाभार्‍यात दगडी महिरपीत नक्षीदार सिंहासनावर श्री वरद विनायकाची मूर्ती आहे. मूर्ती सिंहासनापासून निराळी आहे. मूर्ती बैठी, डाव्या सोंडेची व पुर्वाभिमुख आहे.


८. श्री बल्लाळेश्वर ( पाली)

Ballaleshwar Temple , Pali

पालीचा श्री बल्लाळेश्वर हे अष्टविनायकात अत्यंत प्रसिध्द व जागृत स्थान आहे. हे तीर्थक्षेत्र रायगड जिल्हयातील सुधागड तालुक्यात कर्जत स्टेशनच्या नैॠत्येस सुमारे ३० कि. मी. अंतरावर आहे व पुण्यापासून ११० कि.मी. अंतरावर आहे.

गाभार्‍यात दगडी सिंहासनावर श्री बल्लाळेश्वराची तीन फुटी उंचीची मूर्ती आहे. मूर्ती पुर्वाभिमुख असून डाव्या सोंडेची आहे. मूर्तीच्या डोळ्यात, बेंबीत चकचकीत हिरे आहेत. मागील प्रभावळ चांदीची असून, त्यावर ॠध्दिसिध्दि चवर्‍या ढाळीत उभ्या आहेत. बाहेर उंदराची मूर्ती मोदक घेऊन गणेशाकडे बघत उभी आहे.